औरंगाबाद : बिडकीन परिसरातील औरंगपुरावाडी शेतवस्तीवर राहणार्या दहा वर्षीय मुलाला घोड्याने लाथ मारली. उपचारादरम्यान आज पहाटे मुलाचा मृत्यू झाला आहे.
दादासाहेब विजय पवार (वय 10 वर्षे) राहणार औरंगपुरा वाडी असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून दादासाहेब हा मुलगा आपल्या आई-वडिलांसह औरंगपुरा वाडी शिवारातील शेतवस्तीवर राहतो. तेथे त्याचे आई-वडील वीट भट्टीवर काम करतात. 11 मे रोजी नेहमीप्रमाणे सायंकाळच्या सुमारास दादा साहेब याचे वडील व आई हे वीटभट्टीवर काम करण्यासाठी गेले होते. त्यावेळी दहा वर्षीय मुलाने झोपडपट्टी समोर बांधलेल्या घोड्याला चारा-पाणी केले आणि घोड्याच्या अवतीभोवती तो खेळत होता. घोड्याने अचानक त्याला गुप्तांगावर लाथ मारली. त्यामुळे दहा वर्षीय दादासाहेब हा बेशुद्ध पडला. आजूबाजूच्या नागरिकांनी दादासाहेब तात्काळ येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना आज पहाटे त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद बिडकीन पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास जमादार भटकर हे करत आहेत.